{"product_id":"मोती-गहू-माळा-moti-gahu-mala-1","title":"मोती गहू माळा | Moti Gahu Mala","description":"\u003cp\u003eगहू माळा (Gahu Mala) हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे. या माळेतील मण्यांचे आकार गहू (wheat grain) म्हणजेच गहूच्या दाण्याप्रमाणे असतात. त्यामुळे हिला “गहू माळा” असे नाव देण्यात आले आहे. ही माळ समृद्धीचे प्रतीक मानली जाते. मोती हे सौंदर्य, कोमलता आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांच्या नाजूक आणि तेजस्वी रूपाला अधोरेखित करणारे दागिने म्हणून मोत्यांचा वापर केला जातो. राणी अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, काशीबाई, आणि इतर राजमाता यांनी मोत्यांचे दागिने वापरले आहेत. मोती हे चंद्राशी संबंधित रत्न मानले जाते, आणि चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान केल्याने मनःशांती, भावनात्मक समतोल, आणि आध्यात्मिक उन्नती लाभते, असे मानले जाते. सध्या मोत्यांचे दागिने पारंपरिक पोशाखासोबत वेस्टर्न पोशाखासोबत सुद्धा परिधान केले जातात. हलक्या वजनाचे, आकर्षक आणि सभ्य स्वरूपामुळे मोत्यांचे दागिने कार्यक्षम स्त्रियांसाठीही आदर्श मानले जातात. आजच्या काळातही विवाह, साखरपुडा, बारसं, मंगलकार्य यामध्ये मोत्यांचे दागिने प्राधान्याने वापरले जातात.\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":50292147519794,"sku":"PHC-09","price":3500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_7564.jpg?v=1781202043","url":"https:\/\/prajaktsaj.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-moti-gahu-mala-1","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}