{"product_id":"mhalasa-long-putali-har","title":"मोठा पुतळी हार + कानातले| Long Putali Har + earrings","description":"\u003cp\u003eपुतळी म्हणजे प्रतिमा. अश्या पुतळ्या सोन्याच्या व गोल आकाराच्या चपट्या पत्र्याच्या असतात व त्यावर बहुदा श्रीकृष्णाची, राधा-कृष्णाची वा विष्णुची प्रतिमा कोरलेली असते.  या पुतळ्या शुभ प्रतीकचिन्ह म्हणून वापरण्याची पूर्वापार पद्धत आहे. या पुतळ्यांच्या माळेलाच होनहार, मोहरमाळ, अश्रफीहार, फलमाची माळ असेही म्हटले जाते. प्राचीन दागिन्यांमध्ये सोन्याची नाणी गुंफून केलेला ‘निष्क’ हा दागिना प्रसिद्ध होता. त्याचा १६ व्या -१७ व्या शतकातील महाराष्ट्रीय अवतार म्हणजे पुतळी हार म्हणता येईल. छत्रपती शिवरायांचे कुलदैवत तुळजापुरची श्री तुळजाभवानी.  या महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला राज्याभिषेकाच्या मंगल प्रसंगी त्यांनी जे दागिने भेट दिले त्यात १०१ पुतळ्यांची माळ आहे, जिच्यावर एका बाजूस जगदंब प्रसन्न व दुसऱ्या बाजूस शिवछत्रपती असा नामनिर्देश केलेला आहे.  ही सोन्याच्या नाण्यांच्या रंगाने तयार केली जाते. यासाठी खास पुतळी ताटे बनविली जातात व त्या ताटांची माळ केली जाते. या पुतळीवर दोन्ही बाजूनी प्रतिमा कोरलेल्या असतात. अत्यंत पारंपरिक असा हाराचा प्रकार म्हणजे पुतळी हार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eExperience the intricate beauty and tradition of Maharashtra with our Small Putali har necklace and matching earrings. Handcrafted in the ancient style, this set is a stunning addition to any jewelry collection. Enhance your style and connect with the rich history of Maharashtra with this unique set!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eSpecifications\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eType - Long Necklace\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLength - 12 Inch\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eEarrings Length - 1 Inch\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLock Type - Adjustable Thread\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMaterial - 92.5% Pure Silver with Antique Polish\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"With Earrings","offer_id":47833533055282,"sku":"SLC-18","price":31000.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Without Earrings","offer_id":47833533088050,"sku":"SLC-18-1","price":28400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_5936.jpg?v=1744194537","url":"https:\/\/prajaktsaj.com\/products\/mhalasa-long-putali-har","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}